This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.
One of the important letters of Balaji Bajirao Peshwa to Dattaji Shinde (Scindia) of Gwalior.
श.१६८१ वैशाख शु.६
इ. १७५९ मे २
श्री
अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री रामाजी अनंत गोसावी यांसी सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणे. विशेष. सुजायतदौलाजवळून पनास लाख रुपये घेऊन वजीरी द्यावी, अंताजी माणकेश्वर यास दिलीच्या कारभारातून काढावे, हा मनसुबा, दुसरा, नजीबखानाजवळून तीस लाख घ्यावे. त्याहून तिसरा आपणच पातशाहातेचा बंदोबस्त करावा. याचे सेवटवर कसे ते ल्याहावे, तोपर्यंत लाहोराहून येऊ म्हणोन लाहुराचे पत्री मजकूर. त्यास वजीर दादानी सर्व प्रकारे आपले करून ठेविले ( ते ) निर्बल आहेत. याजपासून केल्या करारात अंतरही काही नाही. ऐसे असोन सुजा अतदौलाचा मनसुबा करणे योग्य नाही. तत्रापि करणे तेव्हा जर पक्की निशा पन्नास लाखांची सहा महिन्यात होती असे दिसल्यास, वजिराजवळून केल्या कारभारात अंतर मातबर पडल्यास, वजिरावर जाटानी व सुजाअतदौलानी एक होऊन यावे. तुम्ही सुजाअतदौलाचे पके राजकारण नाही तर वजीर पातशा बाहेर काढून सुजातदौलाचे परपत्य ( पारिपत्य ) करून मातबर पैका मेळवावा. जर हे गोष्ट वजिराजवळून न होय, बाहेर न निघे, तेव्हा दिलीतील कारभार वजिरावर सोपून सुजातदौला व आपण एक होऊन काशी प्रयागचे काम करून घेऊन, पूर्वेस जावयास सुजातदौला सामील करून घेऊन, त्यास निमे बंगाला देऊ करून मातबर पैका मेळवावा. लाहोर प्रांतीचा बंदोबस्त उत्तम प्रकारे करावा. चिरंजीव दादानी अबदाली ठेविला होता. त्याचाच कोणी मातबर इतबारी ठेवून तो कारभार नीट करून सारा पैका हुजूर येई ते करावे. इतके करून दिलीतील बंदोबस्त होऊन पूर्वेस जावयास बाजद बरसात ठीक पडेल. यंदा छावणी दिलीची कराल तेव्हा सोई पडेलसे दिसते. अंताजी माणकेश्वर यास वारंवार हुजूर बोलाविले असता येत नाही. वजिराकडे पनास लाखांचे हिशेब काढून तेथेच गुंतले. कित्येक लबाड्या करितात. त्या तुमचे प्रत्ययास येऊन त्यास ठेऊ घेता ; मेरट वगैरे परगणे मधीच खातात, वजिरा जवळ हजेरी बारा हजार फौजेची लटकीच देतात, ही चौकशी करीत नाही ; अपूर्व आहे याउपर त्यास पत्र पावतात हुजूर पाठावणे. सुप्रयुक्त आले तर बरे, न आले तर धरावे, लुटावे, माल सर्व सरकारात लावावा. मेरट वगैरे सर्व महाल सरकारात लावावे. वजिरावर रुपयांची वरात चिरंजीवांनी दिली आहे. ती सरकारात वसूल घ्यावी. त्यास याउपरी एक पैसा न द्यावा. जर ही गोष्ट जबरदस्तीने न करता अंताजी हुजूर आला तर त्याचा एक लेक हजार राउतानिशी ठेवावा. बाकी फौज वजिराजवळ चाकरीस पाहिजे ते दुसरी नेमून द्यावी. परंतु अंताजीस ठेऊ नये. याउपरी त्याचा काहीएक मुलाहिजा न करिता कैद करून पाठवणे. तुम्ही कारभारी भिडेस न पडणे. जाणिजे. नजीबखान बाट, अर्धा अबदाली. त्याचे राजकारण न करावे. सुजातदौला व ज्याट ( जाट ) एक जाहाल्यास भारी. उपयोगी नाहीत. यापेक्षा आहेत वजीर ते फारच उपयोगी. परंतु सुजातदौला साहा महिन्याने पनास लाख रुपये खरेखुरे देतात, या वजिराजवळून एक दोन मात्तबर अंतरेयाची तगेरी ( तगीर = तहकुबी ) करावया जोगी जहाल्यास सुजातदौलाचे काम जरूर करावे. मातबर लाभ सोडू नये. याचा विस्तार उभयतां सरदारांस लिहिला असे. तो मनात आणून उत्तम दूरदर्शाने सरकारात मातबर लाभ होऊन, येथील लक्ष्याने वर्त(त) ऐसे प्रकारे जे तुमचे तेथील माहीतगारीस बनेल ते करणे. वरचेवरी कचे वर्तमान लिहित जाणे. जाणिजे छ ४ रमजान. बहुत काय लिहिणे. अंतजीपंतास जरूर हुजूर पाठविणे. सहसा रदबदल ऐकू न देणे. लक्षा प्रकारे वजिरासच राखावे. कदाचित तो करारात वाकडा वर्तत असला तर मात्र मातबर लाभ पुर्ता दृष्टीस पडला तरच सुजातद्दवलास हाती धरावे. परंतु काशी, प्रयाग हरतजविजेने साधावी. विशेष काय लिहिणे. कर्जाची चिंता दतबास असेलच. जाणिजे. लेखनसीमा."
Rough translation
Shalivahan Samvatsara 1681, Vaishakh Shukla 6 (02-05-1759)
Humble salutations to ramaji gosavi (secretary of Shindes) from Balaji Bajiro Panta-Pradhaan.. Please inform me about your well-being more frequently. Few tasks to be attended to with special priority. Firstly, Remove Antaji Mankeshwar from Delhi's politics. Receive 50 lakh rupees from Shujauddaula (of Lucknow) and promise him post of Delhi's "Vajir". Extract 30 lakhs from Najibkhan of Rohilkhand and fix the Mughal emperor (his concerns over punjab campaign). Move base from Lahore. Dada (raghunathrao) had the mughal vajir in his pocket. It is not in interest to let Shuja (lucknow) become vajir, but that promise will make him pay up the sum required.
If you receive money in 6 months and Vazir starts interfering in our affairs, lobby with Shuja and jat (Surajmal) and force him to comply. Do not fix Shuja alone. Maintain the distance which we have created between emperor (mughal) and Vazir and there is a chance, destroy Shuja only with help of Mughal Vazir. In case, Vazir refuses to leave Delhi, suspend this plan of action, and along with Shuja take control of our holy places (Kashi-Prayag etc). Continue with Shuja to conquer Bengal. After it is fixed, negotiate with Shuja for 50% control of Bengal in exchange of a hefty sum. Before you leave for east, fortify the Lahore Province and check the preparations. Remember that Raghoba had left Abdali's sardar alive (Abdus Samad khan). use his advice.
Camp at Delhi for this monsoon and proceed eastwards later. While in Delhi, arrest that corrupt Antaji Mankeshwar and send him to Pune at once. While proceeding eastwards, make sure that Meerut province is enlisted under the domain of government (emperor of Satara OR Pune executive). If Antaji cooperates and turns himself in, make his son a hazaari sardar (chief of 1000 horses). Remember that Najib is traitor and half Abdali (allusion towards Pathan lobby). Do not waste time negotiating with him. If possible unite Shuja and Surajmal against Najib and get at least 30 lakhs from the spoils for us. But ensure that Jat and Shuja do not become too friendly with each other. Hence keep the Mughal Vazir as friend.
Finally saying it again, keep Mughal vazir your friend as far as possible, above all others. Only if he starts reneging the contract (Mughal Maratha contract of protection), then replace him with Shuja in exchange of good profit. But take charge of Kashi, Mathura and Prayag in our hands at all costs. What more to write.. Dattaji knows about debts which have to be repaid.
Keep in touch.
-----------------------------------------------------------
Few notes
1. The severe cash crunch is seen from this letter.
2. Dattaji was ordered to fix najib and extract 30 lakhs from him with help of Shuja. Dattaji decided to conquer Bengal with Najib and then finish him off in Bengal. Meanwhile extracting money from him promising him 50% of Bengal. This Najib however struck Shinde Preemptively and killed Dattaji at Buradi Ghat. (What Shinde did not know, was that Najib was already in contact with Abdali. The news that Maratha army is moving from Punjab to interiors was given to Abdali by Najib. Shinde was general of that army.) Peshwa had explicitly stated not to indulge in talks with Najib, but also asked him to extract money from najib. For Shinde, there was no difference in Najib and Shuja and since Najib was close (from west to east, Braj comes before Awadh) he decided to use najib instead. Shinde started eastward from Delhi in september 1759 and najib kept him in talks for 2-3 months. Meanwhile Abdali had already crossed Sindhu at attock in June 1759 had reached Haryana by December 1759. on January 6 1760, Najib killed Dattaji in sneak attack.