Friday, March 06, 2020

आनंदवनभुवनी - Ānanda vana bhūvanī - by Samartha Rāmadāsa Swāmī

Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.

Ānandavanabhūvanī is one of the most important compositions of Samartha Rāmadāsa Swāmi. He wrote this in his last years on earth. He envisions/dreams/sees a Hindu society and how it should be after Aurangzeb and other Mlechhas are eliminated from this good earth. It is a long poem. It is basically the interpretation or understanding or experience of what and how a Rāmarājya truly is after the bhagavat-vachan of “परित्राणाय साधुनाम् ....... संभावामि युगे युगे” fructifies in a society. It is most interesting to observe that the experience of a rāmarājya by a realised and enlightened Sadguru like Rāmadās swāmi is so different and heart warming than the Ganga-jamuni dhimmi crap peddled by Gandhi et al. Swāmi is openly dreaming of ridding the earth of mlechhas and armies venturing out in all directions etc. This composition gives an excellent view on how a truly Hindu mind uncluttered by Macaulay or Persian domination imagines rāmarājya. 

आनंदवनभूवनी
जन्‍मदु:खें जरा दुखें । नित्‍य दु:खे पुन्‍हा पुन्‍हा । 
संसार त्‍यागणें जाणें । आनंदवनभुवनी ।।१।।
वेधले चीत्त जाणावें । रामवेधी निरंतरी ।
रागे हो वीतरागे हो । आनंदवनभुवनी ।।२।।
संसार वोढितां दु:खे । ज्‍याचे त्‍यासीस ठाऊंकें । 
परंतु येकदा जाणे । आनंदवनभुवनी ।।३।।
न सोसे दु:ख तें होतें । दु:ख शोक परोपरी ।
 येकाकी येकदां जावे । आनंदवनभुवनी ।।४।।
कष्‍टलो कष्‍टलो देंवा । पुरे संसार झाला ।
 देहत्‍यागासी येणें हो । आनंदवनभुवनी ।।५।।
जन्‍म ते सोसिले मोठे । आपाय बहुतांपरीं । 
उपाये धाडिलें देवें । आनंदवनभुवनी ।।६।।
स्‍वप्‍नी जें देखिलें रात्री । तें तें तैसेंची होतसे । 
हिंडता फिरतां गेलों । आनंदवनभुवनी ।।७।।
हे साक्ष देखिली दृष्‍टी । किती कल्‍लोळ उठीले । 
विघ्‍नघ्‍ना प्रार्थिले गेलों । आनंदवनभुवनी ।।८।।
स्‍वधर्म आड जें विघ्‍ने । तें तें सर्वत्र उठीलें । 
लाटिली कुटिली देवें । दापिली कापिले बहु ।।९।।
विघ्‍नाच्‍या उठिल्‍या फौजा । भीम त्‍यावरी लोटला । 
घर्डिलीं र्चिडलीं रागे । रडविले बडविले बळे ।।१०।।
हाकिली टांकिली तेणें । आनंदवनभुवनीं । 
हांक बोंब बहु जाली । पुढें खतल्‍ल मांडिले ।।११।।
खौळले लोक देवाचे । मुख्‍य देवची उठीला । 
कळेना काय रे होतें । आनंदवनभुवनीं ।।१२।।
स्‍वर्गीची लोटली जेथे । रामगंगा महानदी । 
तीर्थासी तुळणा नाहिं । आनंदवनभुवनीं ।।१३।।
ग्रंथी जे वर्णिले मागे । गुप्‍तगंगा महानदी । 
जळांत रोकडे प्राणी । आनंदवनभुवनीं ।।१४।।
सकळ देवांची साक्षी । गुप्‍त उदंड भूवने । 
सौख्‍य च पावणे जाणे । आनंदवनभुवनीं ।।१५।।
त्रैलोक्‍य चालिलें तेथें । देव गंधर्व मानवी । 
ऋषी मुनी महायोगी । आनंदवनभुवनीं ।।१६।।
आक्रा आक्रा बहु आक्रा । काय आक्रा कळेचिना ।
 गुप्‍त ते गुप्‍त जाणावे । आनंदवनभुवनीं ।।१७।।
त्रैलोक्‍यी चालिला फौजा । सौख्‍य बंदविमोचनें । 
मोहिम मांडली मोठी । आनंदवनभुवनीं ।।१८।।
सुरेश उठिला आंगे । सुरसेना परोपरीं ।
 वेष्‍टीत कर्कशे यानें । शस्‍त्रपाणी महाबळी ।।१९।।
देव देव बहु देव । नाना देव परोपरीं । 
दाटणी जाहाली मोठी । आनंदवनभुवनीं ।।२०।।
दिग्‍पती चालिले सर्वें । नाना सेंना परोपरीं । 
वेष्‍टीत चालिले सकळै । आनंदवनभुवनीं ।।२१।।
मंगळे वाजती वाद्यें । माहांगणासमागमे । 
आरंभी चालीला पुढें । आनंदवनभुवनीं ।।२२।।
राशभें राखिलीं मागें । तेणें रागेंची चालिला । 
सर्वत्र पाठीसी फौजा । आनंदवनभुवनीं ।।२३।।
अनेक वाजती वाद्ये । ध्‍वनी कल्‍लोल उठीला । 
छेबींने डोलती ढाला । आनंदवनभुवनीं ।।२४।।
विजई दीस जो आहे । ते दीसीं सर्व उठती । 
अनर्थ मांडला मोठा । आनंदवनभुवनीं ।।२५।।
देवची तुष्‍टला होता । त्‍याचे भक्तीस भुलला । 
मागुता क्षोभला । आनंदवनभुवनीं ।।२६।।
कल्‍पांत मांडला मोठा । म्‍लेंछदैत्‍य बुडावया । 
कैपक्ष घेतला देवीं । आनंदवनभुवनीं ।।२७।।
बुडाले सर्व ही पापी । हिंदुस्‍थान बळावलें । 
अभक्तांचा क्षयो जाला । आनंदवनभुवनीं ।।२८।।
पूर्वी जे मारिले होतें । ते ची आतां बळावलें । 
कोपला देव देवांचा । आनंदवनभुवनीं ।।२९।।
त्रैलोक्‍य गांजिले मागें । ठाउकें विवेकी जना । 
कैपक्ष घेतला रामें । आनंदवनभुवनीं ।।३०।।
भीम ची धाडिला देवें । वैभवें धांव घेतलीं । 
लांगूळ चालिले पुढे । आनंदवनभुवनीं ।।३१।।
येथूनी वाढिला धर्म । रमाधर्म समागमें । 
संतोष मांडला मोठा । आनंदवनभुवनीं ।।३२।।
बुडाला औरंग्‍या पापी । म्‍लेंछसंहार जाहाला । 
मोडलीं मांडली क्षेत्रे । आनंदवनभुवनीं ।।३३।।
बुडाले भेदवाही ते । नष्‍ट चांडाळ पातकी । 
ताडिले पाडिले देव । आनंदवनभुवनीं ।।३४।।
गळाले पळाले मेले । जाले देशधडी पुढे ।
 निर्मळ जाहाली पृथ्‍वी । आनंदवनभुवनीं ।।३५।।
उदंड जाहालें पाणी । स्‍नान संध्‍या करावया ।
 जप तप अनुष्‍ठानें । आनंदवनभुवनीं ।।३६।।
नाना तपे पुन्‍हश्र्चणैं । नाना धर्म परोपरीं । 
गाजली भक्ती हे मोठी । आनंदवनभुवनीं ।।३७।।
लीहीला प्रत्‍ययो आला । मोठा आनंद जाहाला । 
चढता वाढता प्रेमा । आनंदवनभुवनीं ।।३८।।
बंड पाषांड उडालें । शुध आधात्‍म वाढलें । 
राम कर्ता राम भोक्ता । आनंदवनभुवनीं ।।३९।।
देवालयें दीपमाळा । रंगमाळा बहुविधा । 
पुजिला देव देवांचा । आनंदवनभुवनीं ।।४०।।
रामवरदायनी माता । गर्द घेउनी उठीली । 
मर्दिले पूर्वीचे पापी । आनंदवनभुवनीं ।।४१।।
प्रतेक्ष चालिला राया । मूळमाया समागमें । 
नष्‍ट चांडाळ ते खाया आनंदवनभुवनीं ।।४२।।
भक्तांसी रक्षिलें मागें । आतां ही रक्षिते पाहा । 
भक्तांसी दीधले सर्वै । आनंदवनभुवनीं ।।४३।।
आरोग्‍य जाहाली काया । वैभवें सांडिली सीमा । 
सार सर्वस्‍व देवाचें । आनंदवनभुवनीं ।।४४।।
देव सर्वस्‍व भक्तांचा । देव भक्त दुजें नसे । 
संदेह तुटला मोठा । आनंदवनभुवनीं ।।४५।।
देव भक्त येक जाले । मिळाले जीव सर्व हि । 
संतोष पावले तेथें । आनंदवनभुवनीं ।।४६।।
सामर्थे येश कीर्तींची । प्रतापें सांडिली सीमा । 
ब्रीदेंची दीधली सर्वे । आनंदवनभुवनीं ।।४७।।
राम कर्ता राम भोक्ता । रामराज्‍य भुमंडळीं । 
सर्वस्‍व मीच देवाचा । आनंदवनभुवनीं ।।४८।।
हेंची शोधुनी पाहावें । राहावें निश्‍चळी सदा । 
सार्थक श्रवणें होतें । आनंदवनभुवनीं ।।४९।।
वेद शास्‍त्र धर्मचर्चा । पुराणें माहात्‍में किती । 
कवित्‍वें नूतनें जीणें । आनंदवनभुवनीं ।।५०।।
गीत संगीत सामर्थ्‍ये । वाद्य कल्‍लोळ उठीला । 
मिळाले सर्व आर्थाथीं । आनंदवनभुवनीं ।।५१।।
वेद तो मंद जाणवा । सीद्ध आनंदवनभुवनीं । 
आतुळ महिमा तेथें । आनंदवनभुवनीं ।।५२।।
मनासी प्रचीत आली । शब्‍दीं विश्‍वास वाटला । 
कामना पुरती सर्वे । आनंदवनभुवनीं ।।५३।।
येथुनी वांचती सर्वे । ते ते सर्वत्र देखती । 
सामर्थ्‍य काये बोलावें । आनंदवनभुवनीं ।।५४।।
उदंड ठेविलें नामें । आपस्‍तुतीच मांडिली । 
ऐसे हें बोलणें नाहिं । आनंदवनभुवनीं ।।५५।।
बोलणें वाउगें होतें । चालिणे पाहिजें बरें । 
पुढे घडेल तें खरें । आनंदवनभुवनीं ।।५६।।
स्‍मरलें लिहीलें आहे । बोलता चालता हरी । 
काये होईल पाहावें । आनंदवनभुवनीं ।।५७।।
महिमा तों वर्णवेना । विशेष बहुतांपरी । 
विद्यापीठ तें आहे । आनंदवनभुवनीं ।।५८।।
सर्वसिद्या कळा विद्या । न भूतो न भविष्‍यति । 
वैराग्‍य जाहालें सर्वे । आनंदवनभुवनीं ।।५९।।